Babujinchi Noteshansaha Gani (बाबूजींची नोटेशनसह गाणी)
₹185.00
बाबूजींच्या सुमधुर गाण्यांचे नोटेशन या पुस्तकात दिले आहे. यामध्ये प्रत्येक गाण्याचे तालाप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने नोटेशन दिले आहे. नव्याने वाद्य शिकणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी तसेच आवड म्हणून वाद्य वाजवणाऱ्यांसाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. बाबूजींच्या गाण्यातील प्रत्येक जागा नोटेशनच्या साहाय्याने वाजवण्यात त्यातला आनंद रसिकांना मिळेल अशी खात्री मनात ठेवून या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
Description
शब्द आणि सूर यांचे अद्वैत म्हणजे काय, याचा आदर्श सुधीर फडके यांच्या अनेक गाण्यांतून पाहायला मिळतो. त्यांनी सुमारे १० वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले असल्याने त्या शास्त्रीय ज्ञानाच्या ‘जागा’ अनेक गाण्यांतून कुठे ना कुठे दिसतात. नव्याने पेटी किंवा अन्य वाद्य शिकणाऱ्या व्यक्तीला अशा ‘जागा’ वाद्यातून कशा काढाव्यात हे लक्षात येण्यासाठी या पुस्तकामध्ये बऱ्याच गाण्यांच्या नोटेशनच्या खाली ‘तळटिपा’ म्हणून काही मजकूर मार्गदर्शनार्थ लिहिला आहे.
या पुस्तकात दिलेले नोटेशन बाबूजींच्या सुमधुर अशा प्रत्येक गाण्याचा ताल लक्षात घेऊन व त्याप्रमाणे ‘खंड’ पाडून दिले आहे. तालात गाणे वाजविताना असे खंड आवश्यक असतात. परंतु, नवोदित किंवा साधारण पेटी वाजविता येणाऱ्या लोकांनी गाण्याची संपूर्ण ओळ वहीत लिहून त्याखाली प्रत्येक शब्दासाठी पुस्तकात दिलेले नोटेशन लिहिल्यास समजणे सोपे जाईल.
अल्पावधीतच या पुस्तकाला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादाने याची
उपयुक्तता सिद्ध केली आहे.
“The ideal of the unity of words and melody is beautifully exemplified in the many songs of Sudhir Phadke. Having studied classical music for nearly ten years, his knowledge shines through in various compositions, demonstrating the deep connection between lyrical expression and musicality. This book aims to help those learning to play the harmonium or other instruments grasp these nuances. Below the notations of many songs, the author has included ‘footnotes’ that provide guidance on how to extract these subtleties from the music.
The notations provided in this book take into account the rhythm of each of Babujinchi’s sweet songs and are structured into segments. These segments are essential for playing the songs accurately in rhythm. For novice musicians or those who can play the harmonium at a basic level, the book recommends writing the entire line of a song in their notebook and placing the corresponding notation below each word. This approach simplifies the learning process, making it easier to connect the notation with the lyrics.
The book has already received a tremendous response, demonstrating its utility and effectiveness as a learning resource.
For anyone seeking the best book on musical instruments, musical notation, or music exam preparation, this guide offers an ideal blend of practical advice and musical insight, making it invaluable for learners at all levels.”**

Additional information
| Weight | 109 g |
|---|
You must be logged in to post a review.









Reviews
There are no reviews yet.