Noteshansaha Bhaktigeete Bhag – 1 (नोटेशनसह भक्तिगीते भाग १)
₹220.00
आजच्या रिमिक्सच्या जमान्यातही गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या भक्तिरसाने ओथंबलेल्या निवडक भक्तिगीतांचा हा संच आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व, नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे. भक्तिगीते वाजवण्यासाठी खास टिपा व उपयुक्त सूचना या पुस्तकाच्या पहिल्या भागात दिल्या आहेत.
Description
‘क्षणभर उघड नयन देवा’ किंवा ‘रघुपती राघव गजरी गजरी’ यांसारखे भक्तिरसाने ओथंबलेले भगवंताच्या आळवणीचे सूर प्रभातसमयी वाऱ्यावर लहरत कानावर आले की सकाळ कशी मंगलमय होते.
आजच्या पॉप आणि जॅझच्या संगीताच्या जमान्यातही गेली ४०-४२ वर्षे अवीट, मधुर शब्दांच्या भक्तिगीतांनी आपलं मन व्यापलं आहे. ही भक्तिगीते आपल्या थकलेल्या मनाला शांतता व आनंद देतात.
चंद्रकांत साने यांचे हे असेच भक्तिरसात चिंब भिजवणारे, नवोदित गायक, वादक व कलाकारांसाठी राग, ताल, संगीतातील शैक्षणिक व तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन करणारे आनंददायी पुस्तक.
ही भावपूर्ण भक्तिगीते फक्त गायची नाहीत तर पेटी व कॅसिओवर वाजवायची आहेत. लेखकाने सखोल अभ्यास करून नोटेशनच्या चिन्हांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकात एकूण ३० गाण्यांचा परिचय राग, आरोह, अवरोह व मूळ गायक यासह दिला आहे.
भक्तिगीतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
परिपूर्ण असे हे पुस्तक अल्पावधीतच लोकप्रिय झाले असून त्याच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या आहेत.
नवोदितांनो या पुस्तकातून अभ्यास करा, सराव करा, तुमचा कार्यक्रम लोकांना नक्कीच आवडेल.
आजच्या रिमिक्सच्या जमान्यातही गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या भक्तिरसाने ओथंबलेल्या निवडक भक्तिगीतांचा हा संच आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व, नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे. भक्तिगीते वाजवण्यासाठी खास टिपा व उपयुक्त सूचना या पुस्तकाच्या पहिल्या भागात दिल्या आहेत.

Additional information
| Weight | 159 g |
|---|
You must be logged in to post a review.

Reviews
There are no reviews yet.