Atyadhunik IT Career 2024 ++ / अत्याधुनिक आयटी करिअर्स २०२४++
₹135.00
Description
जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला ईश्वराने एक स्वतंत्र देणगी दिलेली असते. प्रत्येक व्यक्तीची प्रतिभा स्वतंत्र असते. प्रत्येकाकडे एक स्वतंत्र कौशल्य, हातोटी व कला असते. परंतु आपण त्याकडे नकळत दुर्लक्ष करीत असतो. जसे झाडाच्या कोणत्या फांदीला फळ येईल, हे सांगता येत नाही त्याप्रमाणे कोणत्या कौशल्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व उजळून निघेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाचा स्वभाव व स्वधर्माकडे दुर्लक्ष करू नये. अंगभूत गुणांचा, क्षमतांचा विकास करून आवडीच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामगिरी करणे, मानसिक समाधान मिळवणे, आर्थिक स्थैर्य टिकवणे म्हणजेच करिअर. मग ते कोणत्याही क्षेत्रात करता येते.
बदलत्या जमान्याची पावले ओळखून त्यानुसार स्वतःला बदलत राहणाऱ्या, नवनवीन कौशल्ये शिकत राहणाऱ्या आणि अर्थातच थोडा वेगळा विचार करणाऱ्या व्यावसायिकाला कायम ‘अच्छे दिन’ येणार. गरज आहे ती मानसिकता बदलायची. ‘अत्याधुनिक आयटी करिअर्स २०२४++’ हे पुस्तक लिहायचा खरे तर हाच हेतू आहे.
You must be logged in to post a review.
Reviews
There are no reviews yet.