मी नांदेड जिल्ह्यातील शिवदरा या गावचा. माझे प्राथमिक शिक्षण शिवदरा येथे झाले. पुढचे पदवीपर्यंतचे शिक्षण मी नांदेड येथे घेतले.
नंतर नोकरीच्या शोधात पुण्यात आलो. माझा भाऊ असिस्टंट आर टी ओ झाला होता. त्याच्याकडून मला प्रेरणा मिळाली व मी स्पर्धा परीक्षा देण्यास सुरवात केली. परिश्रम व अभ्यास यामुळे एम पी एस सीची वित्त व लेखा अधिकारी गट 2 ही परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो.
मित्रांनो, तुम्हाला स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर अभ्यासाचं स्वतःच नीट नियोजन करा आणि केलेलं नियोजन तंतोतंत पाळा. तुम्हाला नक्की यश मिळेल. तुम्ही कोणत्या परीक्षेसाठी तयारी करता आहात त्याबद्दल नीट माहिती घ्या. परीक्षेची काठिण्यपातळी जाणून घ्या. त्या परीक्षेचा अभ्यासक्रम नीट समजून घ्या. आपल्या आवडीनुसार अभ्यासाची रुपरेषा ठरवा आणि योग्य पुस्तके निवडा. दिवसभरात जो अभ्यास तुम्ही केला असेल तो रात्री झोपण्यापूर्वी आठवा. किती आठवतो आहे, काय काय आठवते आहे यावरून पुढील अभ्यासाची दिशा ठरवा. मग यश तुमच्यापासून दूर नाही.
—
शैलेश काळे
वित्त व लेखा अधिकारी (2015)
0 Comments
Leave a comment