Sangeet Shastrache Guide (संगीतशास्त्राचे गाईड)
₹250.00
संगीताच्या आगळ्या विश्वाची सफर घडवणाऱ्या या पुस्तकाचे आपणही जरूर वाचक व्हा.!
Description
संगीत हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, साऱ्या चराचर सृष्टीला मोहित करणारी स्वरांची जादू हा एक चमत्कारच म्हणावा लागेल.
संगीतशास्त्रावर अनेक पुस्तके आहेत. पण संगीताच्या परीक्षार्थ्यांना उपयुक्त असे याचे वर्णन करावे लागेल, प्रश्नोत्तर रूपातून लिहिलेल्या या पुस्तकातून दिलेली संगीतशास्त्राविषयी सखोल व विस्तृत माहिती जिज्ञासू व परीक्षार्थीना मार्गदर्शक ठरेल हे नक्की!
संगीताचा उगम, संगीताचे प्रकार, रागपद्धतीचा उगम, प्रसार, स्वर, ताना, हिंदुस्थानी व कर्नाटकी संगीत, तालशास्त्र, हिंदुस्थानी संगीतातील घराणे व भारतीय वाद्य यासंबंधीची विस्तारित माहिती या पुस्तकातुन मिळते. पुस्तकाच्या शेवटी प्रारंभिक ते विशारद पर्यंतच्या प्रश्नपत्रिका दिल्याने परीक्षार्थीना सरावही करणे शक्य आहे. संगीताच्या आगळ्या विश्वाची सफर घडवणाऱ्या या पुस्तकाचे आपणही जरूर
वाचक व्हा.!

You must be logged in to post a review.









Reviews
There are no reviews yet.