MPSC परीक्षेत यश मिळवून चांगली सरकारी नोकरी मिळविणे आणि आयुष्यात स्थिरस्थावर होणे हे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. MPSC सारख्या अवघड परीक्षेमध्ये चांगले गुण मिळून हे स्वप्न साकार करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना नितीन प्रकाशन शक्य तेवढी सगळी मदत करते. विद्यार्थी सगळ्या विषयांचा अभ्यास करून जेवढ्या जास्त प्रश्नपत्रिका सोडवतात आणि त्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिकांचे तज्ज्ञ शिक्षकांकडून विश्लेषण करून घेतात तेवढे या परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविणे त्यांना सोपे जाते.
तुम्हाला माहीत आहेच की आधी पूर्वपरीक्षा, मग मुख्य परीक्षा, आणि नंतर मुलाखत असे MPSC च्या परीक्षांचे स्वरूप असते. यावर्षी ३ एप्रिल २०२३ रोजी MPSC च्या पूर्वपरीक्षा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना या परीक्षेची संपूर्ण तयारी करता यावी यासाठी नितीन प्रकाशन मो. रा. वाळंबे टेस्ट सिरीज घेऊन आले आहे. पूर्वपरीक्षेच्या एका विषयाच्या पेपरचा सराव करण्यासाठी या टेस्ट सिरीजमध्ये त्या विषयाचे दहा पेपर्स आहेत. यातील प्रत्येक पेपरमध्ये वेगवेगळे प्रश्न विचारले गेले आहेत. प्रत्येक पेपर हा १०० मार्कांचा आहे आणि विद्यार्थ्यांना यातील १०० प्रश्न एका तासात सोडवायचे आहेत. या टेस्ट सिरीजद्वारे वियार्थ्यांचा प्रत्येक विषयाचा सखोल सराव होणार यात काही शंका नाही.
टेस्ट सिरीजमधील विद्यार्थ्यांनी सोडविलेले वेगवेगळ्या विषयांचे पेपर चार तज्ज्ञ शिक्षकांकडून तपासले जाणार आहेत आणि त्याचे विद्यार्थ्यांसमोर त्यांचे विश्लेषण केले जाणार आहे. हे तज्ज्ञशिक्षक आणि ते ज्या विषयांच्या पेपर्सचे विश्लेषण करणार आहेत त्याची माहिती अशी –
श्रीनिवास मांढरे-पाटील – राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र
अजित चहल – गणित, बुद्धिमापन कसोटी, आणि सामान्य विज्ञान
अमृत बनकर – इतिहास आणि भूगोल
अनिरुद्ध गोगटे – चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान
नितीन प्रकाशनच्या टेस्ट सिरीजचे पेपर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने सोडवता येतात. या टेस्ट सिरीजची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे –
- यातील पहिला पेपर सर्वांसाठी मोफत आहे.
- विद्यार्थ्यांने साठपेक्षा जास्त मार्क्स मिळवता आले पाहिजेत यासाठी हे पेपर्स तयार केले आहेत.
- परीक्षेत विचारले जाऊ शकतील अशा प्रश्नांना समोर ठेवुन या सिरीजच्या प्रश्नपत्रिकांची आदर्श रचना केली गेली आहे.
- तज्ज्ञ व्यक्तींकडून प्रत्येक पेपरनंतर प्रश्नपत्रिकेचे सविस्तर स्पष्टीकरण दिले जाते.
- आयोगाच्या रचनेप्रमाणेच या परीक्षेचे नियोजन केले गेले आहे.
- प्रत्येक पेपरवर विद्यार्थ्यांना तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळते.
- चालू घडामोडींवर विशेष भर दिला जातो.
नितीन प्रकाशनच्या टेस्ट सिरीजचे पेपर्स सोडवून आजपर्यंत अनेक विद्यार्थी MPSC परीक्षेत चांगले मार्क मिळवून यशस्वी झाले आहेत. या टेस्ट सिरीजचा फायदा ओळखून यावर्षीचे ऑफलाईन प्रवेश काहीच दिवसात पूर्ण झाले आहेत. सध्या फक्त ऑनलाईन प्रवेश चालू आहेत आणि त्यासाठी रु. ४९९/- असे शुल्क आहे.
MPSC परीक्षेत यश मिळवून आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण आकार द्यायचे जर तुमचे स्वप्न असेल तर नितीन प्रकाशनच्या मो. रा. वाळंबे टेस्ट सिरीज याशिवाय दुसरा उत्तम पर्याय उपलब्ध नाही. याचा फायदा घ्या आणि लगेच ऑनलाईन प्रवेश घेऊन आपले स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका.



0 Comments
Leave a comment