Notationsah Aawadati Gani ( नोटेशनसह आवडती गाणी )
₹220.00
अतिशय सोप्या पद्धतीने पेटी किंवा कॅसिओवर गाणी कशी वाजवावी याची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, पेटीची काळजी कशी घ्यावी, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व आणि नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे. लोकप्रिय मराठी गीते, भावगीते, प्रणयगीते, सिनेगीते, नाट्यगीते अशा ४६ निवडक गीतांचा हा संच रसिकांना नक्कीच भावेल.
85 in stock
Description
मधुर संगीत सर्वांनाच प्रिय असते. आवडीने संगीत ऐकणारे लोक रसिक असतात. काहींना आपल्याला आवडणारी गाणी पेटीवर वाजवता यावी असे वाटते. अशा रसिक पण नवोदित कलाकरांना चांगले वादक होण्यासाठी मार्गदर्शक व मित्र होऊन हे पुस्तक आले आहे.
अतिशय सोप्या पद्धतीने पेटी किंवा कॅसियोवर गाणी कशी वाजवावी, याची विस्तृत माहिती पुस्तकाच्या सुरवातीलाच दिली आहे.
संगीतक्षेत्राची आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, पेटीची काळजी, अलंकाराचे महत्त्व आणि नोटेशनसाठी वापरेल्या चिन्हांचा परिचय ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये.
लोकप्रिय मराठी गीते, भावगीते, प्रणयगीते, सिनेगीते, नाट्यगीते अशा ४६ गीतांच्या नोटेशनचा या पुस्तकात समावेश असल्याने सर्वच रसिकांना ते नक्कीच आवडेल.
वादक कलाकाराने टप्प्याटप्प्याने प्रगतीनुसार गाणी बसविण्यास प्रयत्न करण्यासाठी गाण्याचे सोपे, मध्यम अवघड व अवघड असे तीन भाग केले आहेत. रसिक वादकांनी एकाग्रतेने गाणे ऐकून स्वरांचे सौंदर्य अनुभवले तर
तशीच स्वरांची निर्मिती ते नक्कीच करू शकतील.
तर रसिक वादकहो, पुस्तकातील नोटेशनचा उपयोग करा, चांगले वादक व्हा व स्वतःची करमणूक करता करता इतरांनाही आनंद द्या!

Additional information
| Weight | 1 g |
|---|
You must be logged in to post a review.










Reviews
There are no reviews yet.